आज शैक्षणिक संकुल अर्थे येथे
75 व्या अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी भव्य प्रभात फेरीचे आयोजन
कवी कुसुमाग्रज माध्यमिक विद्यालय अर्थे, मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या माध्यमिक विद्यालय अर्थे व श्रीमती रायाबाई भिवसन चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय अर्थे
या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.वाय.एल.पाटील ,शाखा प्रमुख श्री.आर.सी.सिसोदे तसेच पर्यवेक्षिका श्रीमती.एस.आर.पातूरकर व सर्व शिक्षक बंधू भगिनी
तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवून 75 व्या अमृत महोत्सव च्या निमित्ताने *हर घर तिरंगा या रॅली चे आयोजन करण्यात आले. अर्थे गावातून रॅली काढून या वेळी शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय अधिकारी श्री.आर.बी.महाजन व अर्थे गावाचे पोलीस पाटील श्री.किशोर पाटील सर उपस्थित होते.
या वेळी विद्यालयातील विद्यार्थिनींनी घरुन झेंडे तयार करून आणले होते.व विविध घोषणा देऊन संपूर्ण अर्थे गावातून प्रभातफेरी काढून लोकांना तिरंग्यांचे महत्व पटवून देण्यात आले.
कवी कुसुमाग्रज माध्यमिक विद्यालय अर्थे येथे शालेय-मंत्रिमंडळ निवड संपन्न
दि.30/07/2022 रोजी आमच्या विद्यालयात आजच्या प्रचलित निवडणूक पद्धतीप्रमाणे ई.व्ही.एम सदृश्य मशीनची रचना करून त्यावर शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात आली.मशिनद्वारे मतदान घेऊन शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात आली.मशीनची रचना विद्यालयातील तंत्रस्नेही शिक्षक श्री.गौरव चौधरी सरांनी केली.
मतदान सुरू होण्याच्या अगोदर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.नानासो.वाय.एल.पाटील सर यांनी मतदानाविषयी व निवडणूक विषयी माहिती दिली. केंद्रांध्यक्षाची भूमिका विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती.एस.आर.पातूरकर मॅडम यांनी पार पाडली. व मतदान अधिकारी म्हणून श्रीमती. एस.एस.ईशी व श्रीमती.एस.जी.मोरे आणि श्रीमती.जे.बी.नेरकर मॅम यांनी पार पाडली. विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी विद्यालयातील शिक्षक श्री.के.व्ही.तवर,श्री.आर.डी. चित्ते,श्री.डी. एन.माहेश्वरी, श्री.ए. जी.मराठे श्री.आर.डी राजपूत सर श्री.एन.ए. सूर्यवंशी,श्री गौरव चौधरी सर बंधू-भगिनी यांनी मेहनत घेतली.